Sunday, Sep 21st

Last update04:40:59 AM GMT

You are here: राज्य

शिवसेना व भाजप समोर मांडलेला हा प्रश्न.

  • PDF

“दहशतवादाच्या विरुद्ध केलेल्या प्रयत्नांना, आपल्या राज्या ऐवजी, गुजरातला जास्त अनुकुलता का दाखवली जात आहे?”  हे महाराष्ट्राच्या नागरिकांना स्पष्ट करा : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेना व भाजप समोर मांडलेला हा प्रश्न.

 

आज थोड्या वेळा पूर्वी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेना आणि भाजपला राष्ट्रीय किनारपट्टी पोलीस संस्थेला महाराष्ट्र पासून गुजरातला हलविण्यासाठी दोषी ठरवले.

“केंद्र सरकारने राष्ट्रीय किनारपट्टी पोलीस संस्थेला महाराष्ट्र पासून गुजरातला हलविण्याचा निर्णय का घेतला, ह्याचं स्पष्टीकरण भाजप व शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या नागरिकांना द्यावं लागेल.” असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

किनारपट्टी पोलीस हे राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र कॅबिनेट ने ३०५ एकरच्या पालघर जिल्ह्यातील विराथान मधल्या जमिनीला मंजुरी दिली आहे. पालघर हे गुजरात मधल्या द्वारका जिल्ह्या पेक्षा पाश्चात्य किनारपट्टीवर अधिक मध्यवर्ती स्थित आहे, ही विशेष बाब. 

 

मुख्यमंत्री असं हि म्हणाले की, “या निर्णयामुळे हे स्पष्ट होते की शिवसेना व भाजप ने २६/११ मधल्या मुंबईत झालेल्या हल्ल्यात १६४ हुतात्म्यांच्या बलिदानाचे दुर्लक्ष केले आहे.”पुढे चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढण्या ऐवजी,शिवसेना आणि भाजप हे नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुरक्षेला धोक्यात आणत आहेत. महाराष्ट्राच्या हिताकडे केलेले हे दुर्लक्ष, महाराष्ट्राच्या नागरिकांकडून सहन केले जाणार नाही.”

 

चव्हाण यांनी, महाष्ट्रातले शिवसेना व भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्रांच्या भुमिके बद्दलही प्रश्न उठवला,“ह्या मंत्र्यांनी हा निर्णय खरंच मान्य केला का? की त्यांना विचारले ही नव्हते? उद्धव ठाकरे ह्यांनी ह्या निर्णयाला होकार दिला का? त्यांची पार्टी ही सरकारचा एक भाग आहे. हा निर्णय घेण्याआधी त्यांना सूचित केले गेले होते, का त्यांना ह्या निर्णयाबद्दल आज सकाळच्या पेपर मधूनच माहिती मिळाली?

ओबीसी समुदाय

  • PDF

OBC की एक जाति छोटी हो या बड़ी हो लेकिन एक जाति की लोकतंत्र में ताकात छोटे या बड़े कीडेमकोडे जैसी ही होती है, उसे कोई भी रोंद सकता है.मगर 54% ओबीसी समुदाय की जातिया जब ओबीसी के तौर पर एक और जागृत होती है उन का स्वरूप और ताकात लोकतंत्र में 54% के अजगर का हो जाता है, जिस को रोंदने कोई आये तो रोंदने वाले को अजगर निगल जायेगा,,,


Jayantibhai Manani's photo.


देश का संविधान और मंडल कमीशन रिपोर्ट को लागु करवा के ही देश के ओबीसी समुदाय को और ओबीसी जातियों को सशक्त बनाया जा सकता है लेकिन पढेलिखे ओबीसी को इस बात का पता है क्या?

gadchiroli

  • PDF
AAMCHA VOTE

ओबिसी सेवा संघ मेळावा. लातूर

  • PDF

ओबिसी सेवा संघ मेळावा. लातूर व आसपासच्या 100 किलोमीटर परिसरातील 3000 बांधव उपस्थित होते. सभागृहात जमिनीवर बसण्या पेक्षा कित्येक बांधव मैदानावर उभे राहून भाषण ऐकत होते. मेळावा संपल्यावर बाहेर गावच्या गाड्या निघायला 40-50 मिनिटे वेळ लागला. फुले आंबेडकरी विचार धारेने संपूर्ण मराठवाडा दुमदुमला. जय भारत. जय संविधान.

Pradeep Dhobley's photo.
Pradeep Dhobley's photo.

.OBC ओर इनसेही

  • PDF

ओ बी सी" के 99% लोगो को लाखो का महगा इलाज, लाखों की महगी शिक्षा ,लाखों का महगा मकान एवं पोष्टिक भोजन कठोर मेहनत करने के बाद भी हासिल नहीं है| अपने संवैधानिक अधिकारो को हासिल करने के लिए दिनांक 13-14-सितंमबर 2014 को भोपाल मध्य प्रदेश मे होने जा रहे प्रशिक्षण मे :"ओ बी सी" के सच्चे , बहादुर, स्वाभिमानी समाज सेवी सम्मिलित होने का कष्ट करे||

ओ बी सी

महागाई भत्ता १०७ टक्क्यांवर..

  • PDF

३० लाख कर्मचारी आणि पन्नास लाख पेन्शनरांना होणार फायदा

 नवी दिल्ली - महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याचा प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता असून सध्याच्या १०० टक्क्यांवरून १०७ टक्क्यांपर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे. देशभरातील ३० लाख केंद्र सरकारी कर्मचारी, ५० लाख पेन्शनरांना महागाई भत्ता वाढीचा

लाभ होणार आहे.-webkit-text-stroke-width: 0px; left: 8.>

'औद्योगिक कामगारांसाठीचा १ जुलै २०१३ ते ३० जून २०१४ या काळातील किरकोळ महागाईचा सरासरी दर ७.२५ टक्के आहे. त्यामुळे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ करणार आहे,' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहक किंमत निर्देशाक, तसेच औद्योगिक कामगारांची जूनसाठीची माहिती कामगार मंत्रालयाने शनिवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महागाई भत्त्यात या वर्षी १ जुलैपासून वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालय मंत्रिमंडळापुढे ठेवणार आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

पूर्वीच्या 'यूपीए' सरकारने महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करून तो ९० टक्क्यांवरून १०० टक्के केला होता. या वर्षी १ जानेवारीपासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने २८ फेब्रुवारीला घेतला होता.

दरम्यान, आताच्या महागाई भत्त्यातील ७ टक्के वाढीसाठी कर्मचारी संघटना तितक्याशा उत्सुक नाहीत. महागाई भत्ता किमान वेतनात (बेसिक पे) एकत्र करावा ही सरकारी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मात्र, सातवा वेतन आयोग आणि सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई भत्त्याने ५० टक्क्यांची पातळी ओलांडल्यास तो किमान वेतनात एकत्र करण्याची या पूर्वची पद्धत होती. किमान वेतनावर देण्यात येणारे इतर भत्तेही त्याप्रमाणे वाढत होते. मात्र, सहाव्या वेतन आयोगाने या पद्धतीला फाटा दिला होता.

सत्यशोधक ज्ञानपिठ के पाठ्यपुस्तक पर परिक्षाए अयोजित

  • PDF

नाशिक महानगर पालिका शिक्षा मंडल ने सत्यशोधक ज्ञानपिठ के पाठ्यपुस्तक पर परिक्षाए अयोजित की थी। 3000 लडके लडकिया परिक्षा मे सामील हुई। आज फायनल एक्झाम थी। माननीय संजय भाऊ साबळे (नगरपाल), माननीय श्रीमती किरण कुंवर मॅडम, प्रोफे. श्रावण देवरे, चंद्रकांत गायकवाड, भास्कर साळवे आदी मान्यवर उपस्थित थे। सिलबंद पॅकेटसे प्रश्नपत्रिका निकालते हुए मान्यवर....।

वर्धा जिल्ह्यात रोजगार निर्मिती

  • PDF

तमाम मित्रमंडळी, हितचिंतकानो,

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचे बळ पाठीशी असल्यानेच आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या आणि समर्थपणे पेलल्या. ३० वर्ष पत्रकारिता करतानाच, जनसंवाद आणि जनसंपर्क क्षेत्रात कार्य करताना मी अनेकांच्या समस्या दूर करण्यासाठी लढलो.आणि खास वर्धा जिल्ह्यात काम करताना मला माझ्या मायभूसाठी काम करण्याची संधी मिळत गेली. ईश्वराने या काळात अनेक वेगवेगळ्या परीक्षाही घेतल्या पण अपयश मात्र त्याने माझ्या पदरात टाकले नाही. हं… संघर्ष होताच … या काळात वर्धा जिल्ह्यात मी 
एक ग्रामीण वार्ताहर, साप्ताहिक ब्लिट्झ तसेच लोकसत्ता - इंडियन एक्स्प्रेस या दैनिकांसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले . नंतर दैनिक सामना, जनवाद, देशोन्नती या दैनिकात वार्ताहर ते सहाय्यक संपादक, ब्रांच हेड, असेही काम केले. आता मी जेष्ठ पत्रकार, जनसंवाद आणि जनसंपर्क तज्ञ आणि President - Corporate Affairs (Uttam Value Steels Ltd. Wardha / Mumbai) असा कार्यरत आहे. हे करताना माझ्या वर्धा जिल्ह्यात रोजगार निर्मिती तसेच वर्धा जिल्हातील नागरिकांची आर्थिक उन्नती हे एकच ध्येय ठेवले आहे. मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे करतो आहे. 

Likeअशातच आता माझ्या काही मित्रमंडळी नी एक नवी जबाबदारी टाकली. ती म्हणजे वर्धा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणे. आणि यासाठी शिवसेना या पक्षाची उमेदवारी मागण्यास प्रवृत्त केले. मलाही ही गोष्ट पटली. पत्रकार म्हणून लिहिताना, आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींवर, जनसमस्या सोडविण्यासाठी आपल्या लिखाणातून दबाव निर्माण करायचा…. मग संधी स्वतः समोर आली असताना छातीठोक आपणही का निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे नाही …? म्हणून मी यंदा ही नवी जबाबदारी पेलण्यास सज्ज झालो आहे. मी यंदाच्या निवडणुकीत वर्धा मतदार संघातून शिवसेना या पक्षाची उमेदवारी मागितली आहे. नुकतेच २८ आगष्ट ला मुंबई ला मातोश्री, मुंबईतून बोलावणे आल्याने गेलो होतो. सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत चांगला प्रतिसाद मिळाला. आता तिकीट वाटप केव्हा होते आहे याची वाट पाहतो आहे. 

माझ्या या उमेदवारीला केवळ महायुतीच नवे तर इतरही प्रमुख पक्षातील मित्रांनी समर्थन व्यक्त केले आहे हे इथे विशेष नमूद करावेशे वाटते. तिकीट मिळाल्यास मी ही निवडणूक लढवेल. पण कुणाही इतर पक्षाच्या उमेदवाराला विरोधक समजणार नाही. आणि तसे कुणीही समजू नये. मला समाजकारण करायचे आहे . 
मित्रांनो, राजकारण हे काही माझे bread and butter नाही. त्यामुळे काही राजकारण्यांसारखे पैसे कमाविण्यासाठी मी यात उतरत नाही आहे. मला हवा आहे विकास आणि सर्वांगीण उन्नती माझ्या क्षेत्राची … माझ्या जिल्ह्यचि… मग करू न हा प्रयत्न… 
मला यासाठी आपल्या शुभेच्छा हव्या आहेत … वर्धा बाहेर राहणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील मित्रांनाहि विनंती… जर का माझी भूमिका पटत असेल तर वर्ध्यात त्यांचे कुणी स्नेही, मित्र, नातलग राहत असतील त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे …. तसेच शिवसेनेशी, त्यांच्या कोणत्याही नेतेमंडळी सोबत संबंध असल्यास सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या पर्यंत आपला आवाज पोहचवावा. माझी भूमिका पसंत पडत असेल तर हा मजकूर facebook, whatsapp वर शेअर करावा. काही सूचना असल्यास This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या वर पाठवाव्यात. मनापासून धन्यवाद.

जय महाराष्ट्र, जय हिंद.

आपला नम्र 
भास्कर लोंढे

कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षण समर्थनार्थ भव्य मोर्चा

  • PDF
Obc Aarakshan Kunbi Parishad's photo.
Obc Aarakshan Kunbi Parishad's photo.

कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षण समर्थनार्थ भव्य मोर्चा सम्पन्न्य... .
यवतमाळ...२३ ऑगस्ट २०१४ ,शनिवार दुपारी १२:३० वाजता …
.....................................................................................
मोर्चा चे नेतृत्व :- मा. प्रदीप वादाफले ,
..........................अध्यक्ष ओबीसी आरक्षण समर्थक कुणबी परिषद

क्षणचित्रे :-
@…. महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 
@… महात्मा फुले पुतळा ला हार अर्पण …।
@… भारत रत्न्य बाबासाहेब आंबेडकर पुतळा ला हार अर्पण …
@…. ४००० ते ५००० कुणबी समाज उपस्तीत ….
@… महिलांची उपस्तीती लक्षणीय होती …।
@… भर पावसात सर्व कुणबी दटून उभे राहिले …।
@ …. एस. पी . चौकात मान्यवरांचे मार्गदर्सन व समाजाला आव्हान ।
@…।सर्व कुणबी ,ओबीसी बांधवांनी आपल्या हक्काकरिता ,पुढील पिढीच्या उज्वल भविष्याकरिता मोठ्या संखेने उपस्तीत होते …।

....... कुणबी जागला...
.............ओबीसी आरक्षण समर्थनार्थ उभा झाला..
..........................................मोर्चात सामील झाला …!

सर्वांचे जाहीर आभार .......
.............................................................................................
. सर्व कुणबी ,ओबीसी बांधवांनी आपल्या हक्काकरिता ,पुढील पिढीच्या उज्वल भविष्याकरिता मोठ्या संखेने उपस्तीत होते .....